5.1.12

आईच्या हातचे जेवण...

दररोज घरचे जेवण जेवायचे याचा कधी तरी कंटाळा यायचा. बरेचदा वाटायचे कि आज हॉटेल मध्ये खाऊ. पण कॉलेज पासून आज देखल ऑफिस पर्येंत आईच्य डब्ब्याने पाठ सोडली नाही. कधी कधी आनंदाने डब्बा तसाच वाया घालवून हॉटेलच्या पायऱ्या चढलो आहे. किव्हा कोणाच्या तर वाढदिवसाची पार्टी म्हणून आईने दिलेला डब्बा बरेचदा घरी परत तसाच गेला आहे. हा डब्बा परत घरी जायचे मूळ कारण बरेचदा त्यादिवशी खिसा जरा खुळखुळत असायचा. आता तर सर्वच मित्र चांगले कमवायला लागले आहेत. आज-काल बरेचदा मूड होतो चला बाहेर जाऊया जेवायला. लगेच घरी कळवले जाते कि मी चलो आज बाहेर जेवायला. बहुतेकारून हे विकेंडला होते. जेवण टाकून गेल्या मुळे बरेचदा आई नाराज झालेली पण पहिली आहे. पण काय करणार शेवटी मन हे द्वाड आहे. घरचे वरण भात खाऊन कंटाळा आला कि मग बाहेरची बिर्यानी खायच मन होतच. अश्या प्रकारे आईच्या हातचे जेवण टाकून गेल्याचे आयुष्यात कैक प्रसंग आहेत.  

पण मी ट्रेकिंग वरून किव्हा कॅम्प वरून बरेच दिवसांनी घरी आलो तेव्हा जर आईने विचारले कि जेवायला काय करू. या वेळेला काय बिजाद आहे मनाची कि बाहेरची बिर्यानी खाऊन येतो असे सांगायची. या वेळेला फक्त वरण-भात कर आणि तोंडाला लावयला पापड-लोणचे पुरे असेच उदगार निघतात. फार-फार तर मस्त पैकी आवडीची भाजी आणि पोळी. बरेच दिवस बाहेर खाल्यावर खरया अर्थाने घरच्या जेवणाचे महत्व कळते. या वेळला आई ज्या उत्साहाने लेकरा करिता जेवण बनवते, तेव्हा जेवणात मीठ-तिखट जरा कमी जास्त झाले तरी त्या जेवणाची सर् काही औरच आहे. कारण या जेवणाला चव मुळात तिखट-मीठ आणतच नाही, आईच्या प्रेमानेच या जेवणाला चव आली असते.

ऑफिसच्या कामा निमित् मला सौदी अरेबिया ला जावे लागले होते. ऑफिस ने हॉटेल मध्ये राहायची सोय किली. हॉटेल मध्ये जेवण बनवू शकत नव्हतो. ३० दिवस सौदी अरेबिया आणि ३-४ दिवस मुंबईत असे ६ महिने करत होतो. महिना भर बाहेरचे खाल्ल्या वर ४ दिवस आईच्या हातचे जेवण जेवायचे याची मज्जा काही औरच. या ४ दिवसात मला कुठल्याही मित्राने बाहेर जेवायला बोलावले तर सरळ नाही सांगायचो. इकडेच तर खऱ्या अर्थाने मला आईच्या हातच्या जेवणाचे महत्व कळले होते असे म्हणावे लागेल.

लग्ना नंतर बायकोने कितीही चांगले जेवण बनवले तरी हि त्याला सुधा आईच्या हाताची चव आली, असे आपण म्हणत नाही. काही ना काही तरी कमी अधिक वाटतेच. प्रेतेकाला आप-आपल्या आईच्या जेवणाची चव आपलीशी वाटतेच, यात काय नवल नाही.

आता सध्या मी ऑफिसच्या कामा निमित् लंडन मध्ये आहे. गेल्या ७-८ महिन्यात मित्रांनी बनवलेले, मित्रांच्या परिवार बरोबर बनवलेले, पी.जी राहतो त्या आंटीने बनवलेले, हॉटेलचे आणि कधी तरी मी बनवलेले खातो. पण तरी हि आईच्या हाताच्या जेवणाची चव मला मिळाली असे हे सांगू शकत नाही. मध्ये ४ दिवसां करता गणपतीला घरी गेलो होतो तेव्हा मात्र मन भरून आईच्या हातचे जेवून घेतले होतो. पण आता परत एकदा आईच्या हातचे जेवायला कधी मिळेल याचीच वाट पाहत आहे आणि त्यामुळे घरी जायचे वेद लागायला लागले आहेत. बघुया हि इच्छा कधी पूर्ण होते......