29.12.11

हाउनस्लॉ लंडन मध्ये मराठ मोळी हॉटेल.

लंडन मधला माझा पहिला दिवस. एर-इंडिया च्या सुमारे ९ तासांच्या कंटाळवाणा प्रवास ने मी लंडन मध्ये दाखल झालो होतो. मला घ्याला ऑफिस मधला मित्र अनुराग तिवारी आणि पल्लवी परब आले होते.

रविवारी सकाळी ७ ताच्या मुहुतावर सर्व भेटलो होतो. सर्वांना मजबूत भूखं लागली होती. मला तर विमानात धड पाणि पण विचारले नव्हते. आता हि मला कुठे खायला घेऊन जात आहे हा माझ्या मनात विचार होताच आणि काही तरी धड खायला मिळाले तर बरे असे मी मनात बोलतो न बोलतो, एवढ्यात पल्लवीने मला विचारले वडा-पाव खाणार का? वडा पाव हे कानावर पडताच मी ३ ताड नाही पण २ ताड तर नक्कीच उडालो. लंडन मध्ये वडा पाव मिळतो? या धक्याने मी त्यांच्या बरोबर हाउनस्लॉला उतरलो. 


हाउनस्लॉ हाइ स्ट्रीट वर असलेल्या "श्री किष्ण वडा पाव" हॉटेल मध्ये शिरलो. छोटेसे फास्ट फुड सेंटर सारखे होते. प्रत्येकी दोन-दोन वडा पाव आणि चहा ऑर्डर केला. ऑर्डर येई पर्येंत आमच्या गप्पा चालल्या होत्या. त्यातून कळले कि हे होटेल मराठी माणसाचे आहे. आधीच पहिल्या धक्यातून मी सावरलो नव्हतो आणि हा आता दुसरा धक्का. मराठी माणूस आणि धंदा हे समीकरण काही पटले नव्हते. थोडावेळाने स्वताला सावरून, मराठी माणूस आणि धंदा ते हि लंडन मध्ये वाह काय बात हे, सही आहे हे. असेच उदगार माझ्या तोंडून निघाले.

ऑर्डर आली आणि सर्व तुटून पडलो वडा पाव वर. आपल्या मुंबई-पुण्यात मिळतो अगदी तसीच चव वडा पावची. चहा सुधा आपल्या काढे उकळलेला मिळतो तसाच.



लंडन मध्ये पहिल्यांदा उतरल्यावर कुठेहि न जाता थेट वडा पाव खायला होटेल मध्ये गेलो आणि ते हि सामानाच्या मोठ्या बॅग सहित. हा अनुभव मनात कुठे तरी एक जागा करून गेला.

गेल्या ७-८ महिन्यात बरेचदा माझे या हॉटेल मध्ये जाणे झाले. कधी वडा पाव, कधी मिसळ, वडा मिसळ, तर कधी नुसता चहा.


गेल्या दीड एक महिन्य पूर्वी मी हाइ स्ट्रीट वरून जात असताना असे निदर्शनात आले कि "श्री किष्ण वडा पाव" छोटेसे फास्ट फुड सेंटर राहिलेले नाही आहे. पूर्वीची छोटी जागा सोडून बाजूलाच मोठ्या जागेत बऱ्या पैकी मोठे हॉटेल झाले आहे. आता हॉटेल मध्ये कधी कधी गर्दीला पण सामोरे जावे लागते.  आता येथे नुसते वडा पाव, मिसळ मिळते असे राहिले नाही. दाबेली, पनीर रोल वगेरे-वगेरे....पदार्थांची संख्या तर वाडतच चाली आहे मात्र दर्जा तसाच आहे. माझ्या अलीकडच्या खेपेला येथे कोकम सरबत पण मिळते असे कळाले.



मला या हॉटेलच्या मालकांचे नाव माहित नाही आहे पण त्यांचे हसमुख चेहेरे सर्वाचे स्वागत करतात तेव्हा फार बरे वाटले. मरठी माणूस बदलतो आहे हे हि पाहायला मिळते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे मराठी माणसाची जवतिक प्रगती होत आहे हे पाहून फारच आनंद होतो.


आता या हॉटेल मध्ये चितळे यांची भाकरवडी आणि लक्ष्मिनारायण चिवडा असे बरेच प्रॉडक्ट मिळतात. मनात कधी तरी इच्छा येऊन जाते कि थालीपित, शिखंड, पुरणपोळी, पिउष, साबुदाणा वडा मिळेल तर किती मज्जा येईलना. मी दादर मध्ये राहिला होतो तेव्हा प्रकाश, आस्वाद अश्या मराठ मोळी हॉटेल मध्ये बरेचदा फिरकायचो. लंडन मधले हे "श्री किष्ण वडा पाव" हॉटेल परी पूर्ण मराठ मोळी हॉटेल आहे आणि प्रकाश, आस्वाद या हॉटेलची मला लंडन मध्ये जराही उणीव भासून देत नाही.

काल मी ऑफिसला जाण्यासाठी बस स्टोप वर बसची वाट पाहत उभा होतो. समोरून मरठी आणि हिंदीतले कलाकार "शयाजी शिंदे" येत होते. त्यांनी माझ्या कडे पहिले आणि माझ्याशी हात मिळवत मराठीत बोलायला सुरवात केली आणि शेवटी मला श्री किष्ण वडा पाव हॉटेल कुठे आहे असे विचारले. या प्रसंगा वरून मला असे वाटले कि आता श्री कृष्ण वडा पाव हॉटेलची ख्याती सर्वत्र पसरायला लागली आहे आणि मी जर असे बोलो कि काही दिवसांनी भारतातून येणारा प्रत्येक माणूस लंडनला आलो आहोत तर एकदा तरी श्री कृष्ण वडा पाव हॉटेलला भेट देऊया तर हे अतिशोक्ती होणार नाही.

टिपणी: - या ब्लोग पोस्ट मधले सर्व फोटो श्री कृष्ण वडा पाव यांच्या फेसबुक खात्यातून मी घेतले आहे कारण माझ्या काढे त्यांचे फोटो नाही आहेत. या फोटोंचे सर्व हक्क श्री कृष्ण वडा पाव यांचे आहेत, जर त्यान हरकत असल्यास फोटो ब्लोग वरून काढण्यात येतील. 

6 comments:

  1. Very nice write up Amey. SKVP mhanje kharach aplay marathi lokana ek respite ahe. Keep up your good work. Mi majha page var tumche link share kele ahe.

    ReplyDelete
  2. हो नक्कीच काही शंकाच नाही....धन्यवाद.....

    ReplyDelete
  3. Hi, This place is owned by Subodh who is cousin of my wife's best friend. Here is other link for its media coverage..

    http://www.firstpost.com/mumbai/oh-to-be-in-london-vada-pav-for-a-quid-192514.html

    ReplyDelete